Saturday, April 9, 2011

स्थितिस्थापकत्व व कंपननिर्मिती (Elaticity & Vibrations)

 सतार, तंबोरा, तुणतुणे इ. तंतुवाद्यात ताणलेल्या तारा असतात. या तारांवर बोटांनी आघात केल्यावर कंपने निर्माण होतात व त्यातून ध्वनी उमटतो. इथे धातूच्या तारांचे स्थितिस्थापकत्व हेच ताणलेल्या अवस्थेत तारा छेडल्यास कंपने निर्माण करते व त्यामुळे ध्वनी उमटतो. तारा ढिल्या राहिल्यास हा चमत्कार दिसत नाही. मूलत: कंपने निर्माण करण्यासाठी स्थितिस्थापकत्व हा गुणधर्म आवश्यक आहे. हा सिद्धांत "न्याय करिकावली "या आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या ग्रंथातील एका श्लोकात स्पष्टपणे म्हणले आहे. तो श्लोक आहे-स्थितिस्थापकसंस्कार: क्षित: क्वचिच्चतुष्र्वपि ।
अतींद्रियो सो विज्ञेय: क्वचित् स्पंदे ऽ पि कारणम् ।।


याचा आशय आहे - स्थितिस्थापकत्वाची अदृश्य शक्ती, घन व इतर चार अवस्थेतील पदार्थात कंपने निर्माण करते.

No comments:

Post a Comment