Saturday, April 9, 2011

गुरुत्वाकर्षण (Gravity)



न्यूटन या शास्त्रज्ञाने झाडावरील सफरचंदाचे फळ खालीच का पडते याचा अभ्यास करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गणिती सूत्रांत मांडला. त्या झाडाची फांदी आठवण म्हणून पुणे विद्यापीठात रोपण केली आहे. आपल्या पूर्वजांना पृथ्वीच्या या खेचकशक्तीची व ती अज्ञात व अदृश्य शक्ती असल्याचीही जाणीव होती. पृथ्वीला गुरुस्थानी मानून तिच्या आदरार्थ ऋषिमुनींनी या अदृश्य शक्तीला नाव दिले ‘गुरुत्वाकर्षण’. ‘न्याय कंदली’ ग्रंथातील एका श्लोकात या गुरुत्वाकर्षणावर व तिच्या परिणामासंबंधी मार्गदर्शन केले आहे, तो श्लोक आहे-

गुरत्वं जलभूम्यो: पतनकर्मकारणम ।
अप्रत्यक्षं पतनकर्मानुमेयं
अथावयवानां गुरुत्वादेव तस्य पतनं तदवयवानामपि
स्वावयव गुरुत्वात् पतनमिती
सर्वत्रकार्ये तदुच्छेद:।


याचा आशय आहे - घन व द्रव पदार्थ गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात. ही शक्ती अदृश्य असून या पडण्याच्या प्रक्रियेमुळे तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. या गुरुत्व शक्तीचा प्रभाव नुसत्या पृथ्वीवरच नव्हे तर तिच्या उपभागांवरपण होत असतो.




                                                                                            loksatta News paper





No comments:

Post a Comment