कोनमापन
कोनमापन (Angle measurement)सध्या सर्व जगभर कोन मापनाची एकच सर्वमान्य पद्धत आहे. या पद्धतीत पूर्ण वर्तुळाचे ३६० समान भाग करून प्रत्येकास एक अंश (degree), एक अंशाचे समान ६० भाग करून प्रत्येकास एक मिनिट (minute) , प्रत्येक मिनिटाचे ६० समान भाग करून त्यास एक सेकंद अशी नावे दिली आहेत. या सर्व पद्धतीत ६ व १० यांचे टप्पे आढळतात. त्यामुळे याला sexa- gecimal system म्हणत असावेत. आपल्या पूर्वजांनी ‘सूर्यसिद्धांत’ (१.२८) या ग्रंथात ही पद्धत वेगळ्या एककात पूर्वीच विकसीत केली आहे, तो श्लोक आहे-
विकलानां कलाषष्टय़ा: तत् षष्टय़ा भाग उच्यते ।
तत्रिशतां भवेद्राशि: भगणो द्वादशैव ते ।।
याचा आशय आहे- कोनमापनासाठी खालील एकेक आहेत
६० विकला= १ कला; ६० कला= १ भग; ३० भग= १ राशी
१२ राशी= १ भगन (खगोली);
(सध्याच्या भाषेत १ विकला= १ सेकंद; १ कला= १ मिनिट; १ भग= १ डिग्री, भग व राशी यांचा गुणाकार ३०७ १२= ३६० अंश म्हणजेच पूर्ण वर्तुळ येते)
Ref: loksatta News paper
No comments:
Post a Comment