Saturday, April 9, 2011

रेषा अंतराचे मापन (Linear measurement)

प्रचलित पद्धतीत फूट, मीटर व त्याचे टप्प्यातील इतर अनेकांनी अंतरे मोजली जातात. मोठय़ा अंतरांसाठी मैल, किलोमीटर ही एकके वापरतात. अगदी सूक्ष्म अशा अंतरांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अणु, परमाणु या कल्पना मांडल्या. परमाणु या सर्वात लहान कणाची ( Atom) कल्पना येण्यासाठी त्यांनी सामान्य माणसास समजेल असा सूर्यप्रकाशात संथपणे तरंगणाऱ्या कणांना अणु (Molecule) म्हणले व त्याच्या १/६० भागास परमाणु हे नाव दिले. 




 अंतरमापनासाठी आपली प्राचीन एकके पुढीलप्रमाणे होती.
८ परमाणु = १ त्रसरेणु ; 

८ त्रसरेणु = रेणु ;  
८ रेणु = १ बालाग्र ;
८ बालाग्र = १ लिख्य;

८ लिख्य = १ युक; 
८ युक = १ यव;
८ यव = १ अंगुल; = (८)७ परमाणु; 

२४ अंगुल = १ हस्त;
४ हस्त = १ दंड = ९६ अंगुल;

२००० दंड = १ क्रोस;
४ क्रोस = १ योजन;


परमाणूच्या (Atom) आकाराची सामान्य माणसास कल्पना यावी या दृष्टीने ‘वैशिक दर्शन’ या ग्रंथातील एका श्लोकात म्हणले आहे.


जालांतर्गते भानौ यत् सूक्ष्मं दृष्यते रज: ।

तस्यषष्टितमो भाग: परमाणु : प्रकीर्तित: ।।


याचा आशय आहे - घरात शिरलेल्या सूर्यप्रकाश किरणात तरंगणारे सूक्ष्म कण प्रमाण मानल्यास त्या कणाच्या १/६० भागास परमाणू म्हणतात.



                                                                    Ref:loksatta News paper

No comments:

Post a Comment