Saturday, April 9, 2011

स्थितिस्थापकत्व (Elasticity)

पदार्थावर बल लावल्यास त्याचा मूळ आकार बदलण्यास तो विरोध करतो. पदार्थ ठिसूळ असल्यास तो मोडून पडतो, पण चिवट असल्यास तो बल काढून घेतल्यावर मूळचा आकार धारण करतो. अशा या चिवट पदार्थाच्या गुणधर्मास आपण स्थितिस्थापकत्व म्हणतो. बाण मारण्याचे धनुष्य यामध्ये स्थितिस्थापकत्वाचा पुरेपूर उपयोग केलेला असतो. इमारत बांधणीत पोलादी सळ्यायुक्त काँक्रीट वापरतात, त्यात पोलादी सळयांचे स्थितिस्थापकत्व या गुणधर्माचा उपयोग केलेला असतो. या गुणधर्माचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी न्यायकंदली या ग्रंथात केला असून तो संबंधित श्लोक आहे





ये धना निबिडा : अवयवसन्निवेशा: तै: विशिष्टेषु स्र्पावत्सु ।
द्रव्येषु वर्तमान: स्थितिस्थापक: स्वाश्रयमन्यथा कतमवनामितम्
यथावत्स्थापयति पूर्ववदृजु: करोति ।।


याचा आशय आहे -
एखाद्या वस्तूवर बल लावल्यास ती त्याच्या मूळ आकारात बदल होण्यास विरोध करते, वस्तूच्या या गुणधर्मास स्थितिस्थापकत्व म्हणतात. बल काढून घेतल्यावर ती वस्तू तिचा तात्पुरता बदललेला आकार सोडून मूळचा आकार धारण करते.




                                                  loksatta News paper

No comments:

Post a Comment