बल लावल्याने गती (speed) गतीमध्ये सातत्य असल्यास तो वेग, (Velocity), वेग सातत्याने बदलत असेल तर तो प्रवेग (Accleration) हे आपण आधुनिक अभ्यासात शिकतो. वास्तवशास्त्रात आलेखपद्धतीने वेग रेषा काढून दाखवतात. प्रवेग निर्मिती ही बलाच्या (Conservation of energy) दिशेवर व किमतीवर अवलंबून असते. शक्तींचे अविनाशित्व (Elasticity) या सिद्धांतानुसार, क्रिया व प्रतिक्रिया यांचा सिद्धांत आपण गणिती सूत्रात मांडतो. या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपल्या पूर्वजांनी ‘वैशेषिक दर्शनम्’ या ग्रंथात श्लोकस्वरुपात केले आहे. तो श्लोक आहे.
वेग:निमित्त विशेषात कर्मणोजायते ।
वेगनिमित्ता पेक्षात कर्मणोजायते, नियत दिक् क्रियाप्रबंध हेतु: ।
वेग: संयोगविशेष विरोधी ।
याचा आशय आहे - गतीमधील बदल बलाच्या बदलामुळे होतो. गतीमधील बदल बलाच्या दिशेत व त्याच्या स्वरुपाप्रमाणेच होतो. क्रिया व प्रतिक्रिया या समान पण विरूद्ध दिशेत असतात.
loksatta News paper
No comments:
Post a Comment