Thursday, April 21, 2011

वेदांमधील आणखी काही शास्त्रीय पुरावे


या आधी  Post  केलेल्या दुव्यांवरून आपल्याला हे माहित झाले असेल कि वेदांमधूनच सर्व शास्त्रांची निर्मिती झाली आहे , इतकेच  नव्हे तर पाणिनी चे व्याकरण भगवान शिवाच्या डमरू मधून उत्पन्न झालेल्या नादांवर अवलंबून आहे .आणि ते संस्कृत भाषेचे इतके परिपूर्ण विवरण करते कि " संस्कृत भाषा आजही जगातील परिपूर्ण अशी भाषा आहे."






  वेदांमध्ये  गणित केवळ तेरा मुख्य आणि सोळा उपसुत्रांच्या आधारे बेरीज वजाबाकी पासून खगोल्यातल्या गणित पर्यंत आणि त्या पलीकडे असणाऱ्या सर्व गणितांचा पुर्ण अभ्यास करते. वैदिक ग्रंथाच्या आधारे बांधलेल्या वास्तूमध्ये दगडी खांब वाद्यांचे आवाज करतात. 

  आपल्या वेदांमधून पुष्पक विमाने , दूर अंतरावर पोहचणारी  दृष्टी , पर्ज्यान्य अस्त्र, ब्रम्हास्त्र  याचे उल्लेख येतात. आपण म्हणतो कि विमानाचा शोध  पास्च्छिमात्यांनी लावला , radio लहरी , रॉकेट चे शोधही आधुनिक आहेत, पण हे शोध आपल्या पूर्वजांनी फार आधीच लावले होते., कित्येक युगांपूर्वी, पण आपण हे ज्ञान जुने म्हणून लक्ष दिले नाही,  कारण ते उलगडून सांगण्यासाठी लागणारी बुद्धी , दृष्टी कलियुगाच्या प्रभावामुळे आपल्यातून नाहीशी झाली  आहे .

आज आपण पृथ्वीच्या दुसर्या भागात चाललेले युद्ध TV  वर  त्याच क्षणी बघू शकतो ,पण महाभारत काळात संजयाने राजवाड्यात बसून कुरुक्षेत्र वरील युद्धाचे वर्णन  केले आहे त्यात सैन्याबला पासून ते शंखनाद , आणि युद्ध भूमी वरचे संवाद  सर्व काही आहे , भगवान व्यासांनी दिलेल्या दिव्या दृष्टी मुळे हे शक्य झाले , अनेक अत्याधुनिक शस्त्राचे उल्लेख आपल्याला वेदातच सापडतात,
म्हणूनच वेद हे संपूर्ण आधारभूत आहेत, सर्वसमावेशक आहेत 
महाभारतात वेदांविषयी जे सांगितले आहे ते असे, 

 " म्हणोनी महाभारती नाही I ते नोहेची लोकी तीही !!
येणे कारणे म्हणीने काही ! व्यासोच्छिष्ट  जगत्रय !!





                          Ref:  अमृतकलश भाग ३ 

               


No comments:

Post a Comment