Friday, April 8, 2011

ग्रहांचे भ्रमण व गुरुत्वाकर्षण (orbiting planets & Gravity)





फक्त सूर्यमालेचा विचार केला तरी सूर्याभोवती अनेक ग्रहगोल भ्रमण करीत असतात. पृथ्वी हा त्यातीलच एक ग्रह. इतर ग्रहांप्रमाणे पृथ्वीलाही गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहेच, त्यामुळे तीही इतर ग्रहांना आपल्याकडे खेचत असणार! मग हे ग्रहगोल पृथ्वीवर येवून आदळले तर काय होईल. भास्कराचार्य लिखित ‘सिद्धांत शिरोमणी’ (१९०६) या ग्रंथातील एका श्लोकात याचा उलगडा केला आहे. यानंतर बरेच वर्षांनी न्यूटनने (१६४२- १७२७) गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गणित पद्धतीत मांडला. भास्कराचार्याचा श्लोक आहे-
आकृष्टिशक्तीश्च महीतयास्वस्थं गुरुस्वाभिमुखं स्वशक्तया।
आकृष्यते तत् पततीव भातिसमे समंतात वच पतत्ययंखे ।।

याचा आशय असा- अवकाशात भ्रमण करणारी ग्रहगोलांसारखी प्रचंड आकाराची वस्तुमाने पृथ्वीकडे खेचली जातात. या आकर्षणामुळे ती पृथ्वीवर आदळतील असे वाटते पण तसे होत नाही कारण अवकाशात अशा वस्तुमानांवर सर्व बाजूंनी आकर्षण (गुरुत्व बल) खेचत असताना ती कसी बरे पृथ्वीवर पडतील?





                                                                                                                          Ref:  loksatta News paper 

1 comment:

  1. very informative paragraphs...along with references...Good work...

    ReplyDelete