व्यवहारात आपण अनेक उपकरणात दोन प्रकारचे विद्युत घट (Cells) वापरतो; ते म्हणजे कोरडे घट (Dry cells) व द्रावण घट (wet cells) शालेय शिक्षणात आपण व्होल्टाज सेल, लेक्लांची सेल इ. चा अभ्यास करतो. मोबाईल, कॅल्क्युलेटर, घडय़ाळे इ. उपकरणांत कोरडे घट वापरतात तर कार, ट्रक, इन्व्हर्टर इ. मध्ये द्रावण घट वापरतात. त्यातून निर्माण होणारा विद्युत प्रवाह एकमार्गी (Direct current) असतो. पाण्यात थोडेसे मीठ टाकून एकमार्गी विद्युत प्रवाहाची दोन टोके (धन व ऋण) बुडवल्यास पाण्याचे (एच टु ओ) विघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन हे दोन घटक वायुरुपात बाहेर पडतात. आपल्या पूर्वजांनी असे विद्युत घट निर्माण केले होते. (आधुनिक व्होल्टाज सेलशी याचे भरपूर साम्य आहे.) या विद्युत निर्मितीचा उपयोग करून त्यांनी पाण्याचे विघटन केले व घटक वायूंना प्राणवायू (ऑक्सिजन) व उदानवायू (हायड्रोजन) अशी नावे दिली, शिवाय उदानवायूच्या हलकेपणाची कल्पना असल्याने विमान बनवण्याची कल्पनाही पुढे मांडली. १४ व्या शतकातील अगस्त्य संहितेत, शिल्प शास्त्र सार प्रकरणात यासंबंधी मार्गदर्शक श्लोक आहेत.
अ)
संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रं सुशोभितम ।
छादयेच्छिखिग्रिवेण चाद्र्राभि: काष्ठ पांशुभि: ।
दस्तालोष्ठो निधातव्य: पारदाच्छादितस्तत: ।
संयोगाज्जायतो तेजो मैत्रावरूणसंज्ञितम् ।।
अनेन जलभंगो ऽ स्ति प्राणोदानेषु वायुषु ।
मातीच्या घटांत तांब्याची पट्टी ठेवा, त्या भोवती कोळशाची पूड व लाकडाचा भुस्सा घालून ओलसर करावा, त्यावर जस्ताची पूड टाकून पाऱ्याचे आवरण घाला, रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन वीज उत्पन्न होते व त्यामुळे पाण्याचे विघटन होऊन त्यातून प्राणवायू (ऑक्सिजन) व उदानवायू (हायड्रोजन) निर्माण होतात.
ब)
एवं शतानां कु भानां संयोग: कार्यकृत् स्मृत:।
वायुबंधक वस्त्रेण निबद्धो यानमस्तके ।
उदान स्वलघुत्वे विभर्त्यांकाश यानकम् ।।
पाणी-विद्युत अपघटनाचे शेकडो घट घेऊन त्यातून निर्माण होणारा हलका वायू (हायड्रोजन) बंद कापडी फुग्यात भरला व असे अनेक फुगे वाहनास बांधले तर त्यातून हवेत उडणारे विमान तयार होऊ शकते.
Ref: loksatta News paper

No comments:
Post a Comment